देश-विदेश

चित्रपट उद्योगावर १०० टक्के कर; भारताला सर्वाधिक फटका

चित्रपट उद्योगावर १०० टक्के कर; भारताला सर्वाधिक फटका
चित्रपट उद्योगावर १०० टक्के कर; भारताला सर्वाधिक फटका फोटो: ठाणे वैभव
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवरुन याची घोषणा केली. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे. आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतात, "एखाद्या बाळाच्या हातून चॉकलेट चोरल्याप्रमाणे आपला चित्रपट निर्मिती व्यवसाय इतर देशांनी चोरुन नेला आहे. त्यामुळेच मी आता अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ (कर) लावणार आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा व्यवसाय जवळपास 20 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. परंतु नव्या टॅरिफमुळे या उत्पन्नात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीपूर्वी अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा बाजार सुमारे 8 मिलियन डॉलर्स एवढाच होता. त्यानंतर यात झपाट्याने वाढ झाली आणि तो 20 मिलियन डॉलर्सपर्यंत गेला. गेल्या काही काळात अमेरिकेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. हिंदी चित्रपट असो वा दक्षिण भारतीय चित्रपट असो, अनेक चित्रपटांनी अमेरिकेत चांगली कमाई केली आहे. परंतु ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनंतर अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600