जिल्हा

वागळेतील १६ लघु उद्योगांचा क्लस्टरमध्ये जाणार बळी

वागळेतील १६ लघु उद्योगांचा क्लस्टरमध्ये जाणार बळी
वागळेतील १६ लघु उद्योगांचा क्लस्टरमध्ये जाणार बळी फोटो: ठाणे वैभव
आमदार संजय केळकर यांनी दिला बेमुदत उपोषणाचा इशारा ठाणे: क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील १६ लघुउद्योगांचा बळी जाणार असून उद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि ४८ तासांच्या आत पाडकामाच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ३५० हून अधिक कामगार आणि त्यांच्या १४०० पेक्षा अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या लघु उद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावे लागले, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. वागळे परिसरातील फेऱोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६ लघु उद्योगांना ठाणे महानगरपालिकेकडून ४८ तासांत पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या गंभीर विषयांची माहिती देण्यासाठी बुधवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट, रोड क्र. २२ येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे १६ लघु उद्योजकांना ४८ तासांत जागा खाली करण्याची व पाडकामाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशींमुळे लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे राहिले असून, या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लघु उद्योगांचे मानवतेच्यादृष्टीने व सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी विनंतीवजा मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिला आहे. ठाणे शहरात एवढे गंभीर प्रश्न आहेत कि विधानसभेत कोणते कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतो. ज्या ठिकाणी बुलडोजर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असते असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे. या उद्योगांमध्ये ३५० हून अधिक कामगार कार्यरत असून त्यांच्या कुटुंबांसह सुमारे १४०० पेक्षा अधिक व्यक्तींचा उदरनिर्वाह या उद्योगांवर अवलंबून आहे. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबांवर गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे अशी लघु उद्योजक संघटनेने दिली आहे. यापूर्वी डॉ. अप्पासाहेब खांबेटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "एकही उद्योग विस्थापित होणार नाही" अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीत देण्यात आलेल्या ४८ तासांच्या नोटिशीबाबतची माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला असल्याचे लघु उद्योजक संघटनेने सांगितले.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600