जिल्हा
भाईंदरमध्ये बंगाली सोनाराची पत्नी व मुलांनीच केली हत्या
भाईंदरमध्ये बंगाली सोनाराची पत्नी व मुलांनीच केली हत्या
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: बुधवारी दुपारी भाईंदर पूर्वेकडील एस.व्ही. रोडवरील सोनल पार्क बिल्डिंग नंबर १ येथील तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये बंगाली सोनार सुशांत पाल (५१) याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयाचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. नवघर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडला. त्यावेळी पाल याचा मृतदेह आढळून आला. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे दिसून येत होते. मृताच्या डोक्यावर जड वस्तूने मारल्याचे निशाण होते आणि मंगळवारी रात्री उशिरा ही हत्या झाल्याचा संशय आहे. शेजारी आणि मृताचा मित्र घोष यांनी सांगितले की पाल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ऑफिसमध्ये एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी, दोन मुले आणि मुलगी वेगळ्या भाड्याच्या घरात राहतात. बुधवारी, दुपारी १२ वाजेपर्यंत दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका प्लंबरने फोन केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
नवघर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठविला. त्यानंतर
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासणी केल्यानंतर सदर हत्या पत्नी अमृता व मुलगा अनित सह दुसरा अल्पवयीन मुलानेच केल्याचे निष्पन्न झाले. नवघर पोलिसांनी पत्नी व मुलास अटक केली असून दुसऱ्या अल्पवयीन मुलास सुधारगृहात पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.