जिल्हा
नाला बंदिस्त करून चार्जिंग स्टेशन उभारणार
नाला बंदिस्त करून चार्जिंग स्टेशन उभारणार
फोटो: ठाणे वैभव
* दुर्गंधीने त्रस्त हिरानंदानी मेडोजच्या रहिवाशांना दिलासा मिळणार
* आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
ठाणे: उघड्या नाल्याच्या दुर्गंधीने झोप उडालेल्या हिरानंदानी मेडोज परिसरातील हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार असून पीपीपी तत्वावर हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतीच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
हिरानंदानी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य उघड्या नाल्यामुळे धोक्यात आले आहे. सुमारे ३०० फूट उघड्या नाल्यामध्ये एसटीपीचे पाणी जात असल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय रात्रीची झोपही उडाली आहे. याबाबत येथील नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार सोमवारी श्री.केळकर यांनी या नाल्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे, महापालिका अधिकारी श्री.खंडागळे आज नागरीक उपस्थित होते.
या नाल्यावर पीपीपी तत्वावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना श्री.केळकर यांनी केली. यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरीकांना दिलासा मिळेलच शिवाय पीपीपी तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने महापालिकेवर देखील आर्थिक बोजा येणार नाही. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन या कामाला गती मिळेल, आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती श्री.केळकर यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.