जिल्हा

भाजप आणि शिंदे गटाकडून महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज

भाजप आणि शिंदे गटाकडून महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज
भाजप आणि शिंदे गटाकडून महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज फोटो: ठाणे वैभव
पोलीस कोठडीत असलेले विलास पाटील यांच्याकडूनही अर्ज भिवंडी: सोमवारी भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महापौर आणि उप महापौरपदासाठी शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भिवंडीत महायुतीमध्ये फूट पडल्याचे दिसते. तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनीही महापौरपदासाठी अर्ज दाखल केले. भिवंडी महापालिकेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत युती आणि आघाड्यांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील. ४६ बहुमताची संख्या असताना काँग्रेस ३०, राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांचा पाठींबा मागितला होता. परंतु समाजवादीने पाठिंबा दिला नव्हता. तर महायुतीत भाजपचे २२ आणि शिंदे गटाचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच कोणार्क विकास आघाडीचे चार नगरसेवक निवडून आले असून त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाकडून येथे सत्ता स्थापनेसाठी विविध प्रयत्न सुरु असतानाच, अचानक कोणार्कचे विलास पाटील यांना जमीनीच्या विक्री प्रकरणात अटक झाली. त्यामुळे शिंदे गटाची जुळवा-जुळव करण्याची गणिते बिघडल्याची चर्चा होती. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक २० फेब्रुवारीला होणार असून सोमवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी १० तर उपमहापौरपदासाठी सात अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महापौरपदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील, त्यांचा मुलगा ॲड. मयुरेश पाटील, पत्नी प्रतिभा पाटील यांनी, भाजपकडून नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि शिंदे गटाकडून सुचिता रुपेश म्हात्रे, काँग्रेसचे तारीक मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांच्या अर्जाचा सामावेश आहे. तसेच, उपमहापौरपदासाठी शिंदे गटाकडून अस्मिता नाईक, भाजपकडून सुहास नकाते, काँग्रेसकडून तारिक मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, कोणार्कचे ॲड. मयुरेश पाटील आणि समाजवादी पक्षाचे शेख अरीब मोहम्मद याकूब यांनी अर्ज दाखल केले. *भिवंडीत भाजप २२ आणि शिंदे गटाचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुती असतानाही दोन्ही पक्षांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्याने आता महायुतीत फूट पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाने अर्ज दाखल केला नसल्याने महाविकास आघाडी सध्या तरी कायम असल्याचे दिसते. पक्षीय बलाबल भाजप -२२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०, शिवसेना (शिंदे)-१२, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)-१२, समाजवादी पक्ष-६, कोणार्क विकास आघाडी-४, भिवंडी विकास आघाडी-३, अपक्ष-१

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600