जिल्हा

भातसा ९० तर बारवी धरण ८१ टक्के भरले

भातसा ९० तर बारवी धरण ८१ टक्के भरले
भातसा ९० तर बारवी धरण ८१ टक्के भरले फोटो: ठाणे वैभव
ठाणे शहरासह जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली ठाणे : गेल्या तीन आठवड्यांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ठाणे शहराला पाणी पुरवणाऱ्या भातसा धरणात ९० टक्के तर बारवी धरणात ८१टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक शहरांचा आणि औद्योगिक क्षेत्रांची पाणी टंचाई दूर झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बुधवारी दिलेल्या अहवालानुसार भातसा धरणाची पाणी साठवण क्षमता ९४२.१० द.ल.घ.मी. असून सध्याचा पाणीसाठा ८४४.७८२ द.ल.घ.मी. एवढा आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ द.ल.घ.मी.असून सध्या २७३.६५ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. भातसा धरण ठाणे-मुंबईला पाणी पुरवठा करत असून बारवी धरण ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह विविध नगरपरिषदांना आणि एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करते. बारवीतील वाढलेला पाणीसाठा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक मानला जात आहे. भातसा आणि बारवीप्रमाणेच जिल्ह्यातील इतर धरणांमधील साठाही समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. मोडकसागर धरण शंभर टक्के भरले असून तेथून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तानसा धरणात ९८.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांतील पाणीसाठ्यातही दररोज वाढ होत असल्याने आगामी काही महिन्यांचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाला असून सर्वाधिक ३२ मि.मी. पाऊस मुरबाड तालुक्यात झाला आहे. ठाण्यात १९ मि.मी., शहापूर १६ मि.मी., मीरा-भाईंदर ९ मि.मी., अंबरनाथ ८ मि.मी., भिवंडी ७ मि.मी., कल्याण ५ मि.मी. आणि उल्हासनगरात ७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पाऊस ठाणे: १९७२ मि.मी., मीरा-भाईंदर: १८४९ मि.मी.,९ कल्याण: ११५१ मि.मी., मुरबाड:१८३३ मि.मी., भिवंडी: १३४१ मि.मी., शहापूर: १२९६ मि.मी., अंबरनाथ: १५१६ मि.मी. धरणांतील उपयुक्त पाणीसाठा बारवी: ८०.७६टक्के, मोडकसागर: १००टक्के, भातसा: ८९.६७ टक्के, तानसा: १००टक्के

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600