जिल्हा
बोगस पोलिसाचा ज्येष्ठ नागरिकाला ३० लाखांचा गंडा
भाईंदर : काशिमीरा येथील एका ८३ वर्षीय रहिवाशाची कुलाब्यातील गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या एका व्यक्तीने ३० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फसवणूक करणाऱ्याने १७ नोव्हेंबर रोजी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे राजाबली इस्माईल साबूवाला यांच्याशी संपर्क साधला आणि मनी लाँड्रिंगच्या चौकशीत साबूवाला यांचे नाव समोर आल्याचा खोटा दावा केला. पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी पैसे न दिल्यास अटक आणि कायदेशीर कारवाईची धमकी फोन करणाऱ्याने दिली. घाबरून आणि मानसिक दबावाखाली, साबुवाला यांनी भामट्याच्या सूचनांचे पालन केले. त्यांनी डीसीबी बँकेतील त्यांच्या मुदत ठेवींमधून १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान एकूण ३० लाख रुपये आरटीजीएसद्वारे फसवणूक करणाऱ्याने दिलेल्या खात्यात ट्रान्सफर केले.
व्यवहार पूर्ण केल्यानंतरच साबूवाला यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. काशिमीरा पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.