जिल्हा
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; साडे तेरा कोटींचे साहित्य जप्त
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; साडे तेरा कोटींचे साहित्य जप्त
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरारोडच्या नयानगर परिसरात व्यावसायिक स्वरूपात एमडी ड्रग्सची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ला यश आले आहे. या कारवाईत आतापर्यंत तब्बल सहा किलो 773 ग्रॅम वजनाचा अंदाजे 13 कोटी 61 लाख 38,480 रुपयांचा एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3च्या सुमारास नयानगर, मीरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान फिरदोस कुरेशी यांच्या घरातून एक किलो 324 ग्रॅम वजनाचा अंदाजे दोन कोटी 66 लाख 17,280 रुपये किमतीचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला. तपासादरम्यान हा अंमली पदार्थ तिचा पती अरबाज कुरेशी याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पुढे नेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंबई, मिरा रोड आणि गुजरात येथून एकामागोमाग एक अशा एकूण 10 आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबाज कुरेशी, मोईज खान, अरमान राईन, सुनिल यादव, मोहम्मद वसिम शेख, इरफान कुडीया, मोहम्मद अराफत अन्सारी, खालदा अन्सारी आणि आकाश यादव यांचा समावेश आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली.
मीरा भाईंदर परिसर दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. राजरोजपणे परिसरात अमली पदार्थांची विक्री होत अस कित्येक वेळा नयानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.