महाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी माजी आमदार सुभाष भोईर यांचा मदतीचा हात
शेतकऱ्यांसाठी माजी आमदार सुभाष भोईर यांचा मदतीचा हात
फोटो: ठाणे वैभव
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाखांचा धनादेश
मुंबई:कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुपूर्त केला.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली, जमीनी खरवडून गेल्या, जनावरे दगावली, घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला, निसर्गाच्या प्रकोपापुढे शेतकरी हतबल झाला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे पॅकेज जाहीर केले.
माजी आमदार सुभाष भोईर यांनी देखील या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १५ लाखांचा धनादेश दिला.यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.