जिल्हा

थकीत मालमत्ता करदात्यांवर केडीएमसीचा कारवाईचा बडगा

कल्याण: मालमत्ता थकबाकीदारांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत सुमारे २२३ नळजोडण्या तोडल्या असून, ५३८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कर उद्दिष्टपुर्तीसाठी थकीत करदात्यांशी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधुन कर वसुलीसाठी पाठपुरावा करीत आहेत. कर भरणा करण्यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जाहिर आवाहन करण्यात आले आहेत. काही थकबाकीदार मालमत्ता कर भरण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत असल्याने, त्यांच्याविरोधात महानगरपालिकेने विशेष वसुलीची सर्वतोपरी कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार मिळकतीच्या नळ जोडणी तोडणे, मिळकत सिल करणे अशा कारवाईचा धडाका सुरु आहे. आतापर्यंत सुमारे २२३ नळ जोडणी तोडल्या असून, ५३८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. याचबरोबर, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीनंतर त्यांची लिलाव प्रक्रियेतून थकीत कर वसुली केली जाणार असून, थकीत करदात्यांची नांवे संबंधित प्रभाग परिसरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. नागरीकांच्या सोईसाठी महानगरपालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र ३१ मार्च, २०२६ पर्यंत सार्वजनिक सुटटीसह, शनिवार व रविवार चालू ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे, सर्व थकबाकीदारांनी आपली मालमत्ता व नळ जोडणी सुरळीत ठेवण्यासाठी आजच मालमत्ता कर जमा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600