महाराष्ट्र

कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला
कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला फोटो: ठाणे वैभव
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असे पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अधिकृतपणे जाईल. न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठे आहेत. पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती अजित पवार यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्या पत्राला आचार्य देवव्रत यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळं कालपासून माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत? नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600