महाराष्ट्र
ठाणे-मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमधील आरक्षण जाहीर
ठाणे-मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमधील आरक्षण जाहीर
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: राज्यातील 29 महापालिकेतील महापौरपदासाठी आज (22 जानेवारी) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्याचे महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव, तर छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळाचे महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आज सोडत निघाली. राज्यातील नऊ महापालिकांमध्ये महिला राज असणार आहे, तर मुंबईसह 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर होणार आहे. कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूरमध्ये महापौरपद ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर ठाणे, जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातींसाठी महापौरपद राखीव ठेवले आहे. केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातींसाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे.
बृहन्मुंबई: सर्वसाधारण महिला, ठाणे: अनुसूचित जाती खुला, कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती खुला, नवी मुंबई: सर्वसाधारण महिला, वसई-विरार: सर्वसाधारण खुला, मीरा-भाईंदर: सर्वसाधारण महिला, उल्हासनगर: ओबीसी खुला, भिवंडी-निजामपूर: सर्वसाधारण खुला, पनवेल: ओबीसी खुला, पुणे: सर्वसाधारण महिला, सांगली-मिरज-कुपवाड: सर्वसाधारण खुला, कोल्हापूर: ओबीसी खुला, पिंपरी-चिंचवड: सर्वसाधारण खुला, सोलापूर: सर्वसाधारण खुला, नागपूर: सर्वसाधारण महिला, अकोला: ओबीसी महिला, अमरावती: सर्वसाधारण खुला, चंद्रपूर: ओबीसी महिला, नाशिक: सर्वसाधारण महिला, मालेगाव: सर्वसाधारण महिला, धुळे: सर्वसाधारण महिला, जळगाव: ओबीसी महिला, अहिल्यानगर: ओबीसी महिला, छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण खुला, लातूर: अनुसूचित जाती महिला, नांदेड-वाघाळा: सर्वसाधारण महिला, परभणी: सर्वसाधारण खुला, इचलकरंजी: ओबीसी खुला, जालना: अनुसूचित जाती महिला
मुंबईत खुला प्रवर्ग महिला गट
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी अखेर आरक्षण सोडत जाहीर झालं आहे. मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र मुंबईतल्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्याने आक्षेप घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली, मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला, त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी काहीकाळ गोंधळ पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.