महाराष्ट्र

मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ

मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ
मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ फोटो: ठाणे वैभव
दहा जागांवर उमेदवार देणार
मुंबई: अखेर मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने ठाकरे बंधुंबरोबर युती केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा-मनसे यूतीकडून 10 जागा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपला आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जाणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झालेली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आला आहे. त्यामुळं मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राष्टरवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा केली होती. मात्र, त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर अखेर ठाकरे बंधूबरोबर युती झाल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600