श्रवण भक्ती ही तर अत्यंत साधी सरळ प्रकाराची भक्ती आहे, कारण त्यामध्ये नुसते आपण श्रवणच करायचे आहे, ते देखील एकट्याने वा समूहासोबत. व्यासपीठ, मोकळे मैदान धर्मसभा, मंदिर इ. ठिकाणी श्रोतृवृंद वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेला असतो. सगळ्यासमोर कीर्तनकार, वक्ता, प्रवचनकार. राष्ट्रीय नेता अभिनेता, संगीतकार, कलाकार गरजेनुसार आपापल्या साथीदारांसह हजर असतो. व आपापले पूर्व नियोजित कार्यक्रम संपन्न करीत असतो. आपल्या अंगी असलेल्या कलेच्या निपुणतेने, समर्थपणे श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवतो. त्याच्या सादरीकरणात इतरांना सहभागी करून घेत असतो. हेच तर त्याचे कौशल्य असते. [अभिनय, संगीत, कथा-कीर्तन, भाषण, पोवाडे इ.इ.] त्यामध्ये श्रोता देखील त्यात तल्लीन होऊन जातो.
तल्लीनता - श्रवण करीत असताना मन तल्लीन होणे वा काही काळ आपले देह्भानच विसरून जाणे ही आध्यात्मिक / आरोग्य / मानसिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्वाची असते. संत पुरुष वा योगी यांच्यादृष्ट्या ही समाधीवस्था फार मोठी असते. कारण त्या मानसिक स्थितीत काही काळ तरी स्वतः म्हणजे त्याला भेडसावणाऱ्या नित्य कटकटीना, दुःखांना, समस्यांना विसरलेला असतो. मग तो एखाद्या गाण्यांचे स्वर तो गुणगुणत असेल वा एखादा ताल वा ठेका मनी धरत असेल. वा एखादा आवडलेला नाटकातील उतारा अभिनायासकट म्हणत असेल किंवा संत चरित्रातील चमत्कारात गुंगत असेल. इ. इ. आणि तीच अंतर्मुखता, तीच तल्लीनता, तीच भावसमाधी, म्हणजेच तल्लीनता होय.
आपण एखादा ज्यावेळी [वैयक्तिक / सार्वजनिक कार्यक्रम ऐकतो, त्यावेळी वक्ता / कीर्तनकार / गायक इ. कुणीही असो, त्यांच्या मुखातून बाहेर आलेल्या ध्वनी लहरी श्रोतृ वृंदाच्या कर्ण पटलावर आपटतात. त्यामुळे झालेल्या ध्वनी कंपनामुळे अति शिघ्रतेने आपल्याला त्या आवाजाची जाणीव होते. ही नैसर्गिक प्रक्रिया शिघ्र होऊन समस्त श्रोत्यांकडून प्रतिक्रिया मिळून श्रोता भाव मुग्ध होतो. वारंवार ह्या भाव समाधीचा श्रोता / भक्तास प्रत्यय येऊ लागतो. हीच त्या निर्गुण / निराकार शक्ती प्रत जाण्यासाठी सहज / सुलभ असलेली श्रवण भक्ती होय.
- रामकृष्ण विनायक अभ्यंकर, २/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर, वझिरा नाका बोरीवली प. मुंबई ४०००९१ मोबा.९८१९८४४७१०
- रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
२/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर,
वझिरा नाका बोरीवली प.
मुंबई ४०००९१
मोबा.९८१९८४४७१०
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.