जिल्हा
मोठागांव ते माणकोली उड्डाण पुलावर स्टंटबाजी
मोठागांव ते माणकोली उड्डाण पुलावर स्टंटबाजी
फोटो: ठाणे वैभव
वाहनचालकांवर विष्णुनगर पोलीसांची कारवाई
कल्याण: विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मोठागांव ते माणकोली उड्डाणपुलावर भरधाव वेगात वाहने चालवून, स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारीत झाला होता. त्याअनुषंगाने विष्णुनगर पोलीस तसेच शहर वाहतूक शाखा डोंबिवली उप विभाग यांनी वाहनचालकांवर कारवाई केलेली आहे.
यामध्ये थार जिप (क्र. एमएच ०५ एफजी ५६५६) चा चालक पियुष म्हात्रे (२१) याच्यावर कारवाई करून १५०० रूपये दंड तसेच दंडाची थकबाकी ३५०० रूपये वसूल करण्यात आलेली आहे. होंन्डई वेरणा कार (क्र. एमएच ०५ जीडी ००४९)चा चालक वेदांत सावंत (१८) याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. स्कॉर्पिओ जिप (क्र. एमएच ०५ सीव्ही ३९८८) या गाडीतून भरधाव वेगात रेसींग करणाऱ्या गाड्यांचे व्हिडीओ काढणारा विशाल विश्वकर्मा (२२), कृष्णा विश्वकर्मा (१९) यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई केलेली आहे.
स्कॉर्पिओ जिप (क्र.एमएच ४६ सीआर ४१११) या गाडीचा चालक प्रदीप ढाकणे (२१) याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
ही कारवाई विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, शहर वाहतूक शाखा डोंबिवलीचे पोलीस पथक यांनी केलेली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.