महाराष्ट्र
लोकलने चार प्रवाशांना उडवले; सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळची घटना
लोकलने चार प्रवाशांना उडवले; सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळची घटना
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने चार प्रवाशांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवले. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सँडहर्स्ट रोड स्टेशनवर काही प्रवासी चालले होते. त्यांना अंबरनाथ फास्ट ट्रेनने धडक दिली. आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तिघांना धडक लागली आहे. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील याची काळजी आम्ही घेत आहोत. असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. ज्यामुळे लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं. इतकंच नाही तर लोकल ट्रेन उशिरा सुरु झाल्याने सीएसएमटी आणि इतर सगळ्याच मोठ्या स्टेशन्सवर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रवाशांना आंदोलनाची कुठलीही कल्पना नव्हती. प्रचंड गर्दी झाल्याने अपघात झाला. अंबरनाथ फास्ट लोकलने धडक दिली आणि हा अपघात झाल्याचे बोलले जाते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.