जिल्हा
विहंगची हॉटेल व्यवसायात रॅडिसन हॉटेल समूहासोबत मोठी गुंतवणूक
विहंगची हॉटेल व्यवसायात रॅडिसन हॉटेल समूहासोबत मोठी गुंतवणूक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे व मीरा-भाईंदर येथे दोन नव्या हॉटेल प्रकल्पांची घोषणा
मुंबई: आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी असलेल्या रॅडीसन हॉटेल ग्रुपने विहंग ग्रुपसोबत मुंबई महानगर क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे दोन नवीन हॉटेल प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. हे प्रकल्प अर्थात, विहंग ग्रुप आणि विहंग अहेड यांच्या भागीदारीत विकसित केले जाणार आहेत.
या दोन्ही प्रकल्पांमुळे एकूण २१७ खोल्यांची भर पडणार असून मुंबईच्या पारंपरिक व्यावसायिक केंद्रांबाहेरील उदयोन्मुख भागांमध्ये हॉटेल व्यवसायाचा विस्तार करण्याच्या रॅडिसनच्या धोरणाला चालना मिळणार आहे.
ठाणे येथे उभारण्यात येणाऱ्या हॉटेलमध्ये ११४ खोल्या असतील, तर मीरा-भाईंदर येथील हॉटेलमध्ये १०३ खोल्यांची सुविधा असेल. विशेष म्हणजे, मीरा-भाईंदरमध्ये उभारले जाणारे हे पहिले पाचतारांकित हॉटेल ठरणार आहे.
दोन्ही हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल, मिटिंग स्पेसेस, जिम आणि स्विमिंग पूलसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामुळे कॉर्पोरेट, मिटिंग्ज, इंसेंटिव्हज, कॉन्फरन्सेस तसेच पर्यटक वर्गासाठी दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे व मीरा-भाईंदर हे भाग वेगाने विकसित होत असून आयटी, व पायाभूत क्षेत्रातील वाढ आणि वाढती व्यावसायिक मागणी यामुळे येथे हॉटेल व्यवसायाला मोठी संधी निर्माण झाली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो लाईन ९ आणि सुधारित रस्ते संपर्कामुळे या भागाचा विकास वेगाने होत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि विमानतळाशी असलेली सुलभ जोडणी या प्रकल्पांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
रॅडिसन हॉटेल समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल शर्मा यांनी सांगितले की, “भारतातील महानगरांमध्ये उदयोन्मुख व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विस्तार करणे ही आमची प्रमुख रणनीती आहे. या प्रकल्पांमुळे आम्ही भविष्यातील वाढत्या मागणीसाठी सज्ज आहोत.”
विहंग समूहाचे संस्थापक प्रताप सरनाईक यांनीही या भागीदारीला “मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा” असे संबोधले.
सध्या रॅडिसन हॉटेल समूहाचे भारतात २०० हून अधिक हॉटेल्स कार्यरत किंवा विकासाधीन आहेत. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये कंपनीचा मोठा विस्तार सुरू आहे.
या नव्या प्रकल्पांमुळे ठाणे आणि मीरा-भाईंदर हे भाग प्रीमियम हॉस्पिटॅलिटी नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून, मुंबई महानगर क्षेत्रातील आर्थिक आणि व्यावसायिक वाढीला नवी चालना मिळणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.