जिल्हा
कोण होणार ठामपाच्या तिजोरीचे राखणदार?
स्थायी समितीत भाजप देणार दोन अनुभवी तर एक नवखा सदस्य
ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर दोन अनुभवी आणि एक नवखा नगरसेवक पाठविण्याचा निर्णय ठाण्यातील भाजपाने घेतला असून शिवसेना कोणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची संख्याबळानुसार निवड केली जाणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला नऊ, भाजपाला तीन, राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एमआयएम यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे.
शुक्रवारी सकाळी पक्षाचे गटनेते स्थायी समिती सदस्य पदाची शिफारस महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्याकडे करतील, त्यानंतर त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. भाजपाने स्थायी समितीमध्ये दोन अनुभवी आणि एक नवखा नगरसेवक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोणाचा नंबर लागतो ते उद्या कळणार आहे.
शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक नऊ जागा येणार आहेत. स्थायी समितीमध्ये राम रेपाळे, हणमंत जगदाळे, संजय भोईर, रमाकांत मढवी, विकास रेपाळे, योगेश जानकर, शैलेश पाटील, मालती पाटील, सिद्धार्थ ओवळेकर, मनोज शिंदे, विमल भोईर, प्रकाश शिंदे, नम्रता भोसले या अनुभवी तर नवखे मंदार केणी, अनिल भोर, आदेश भगत, साक्षी मढवी, राजू फाटक यांच्या नावाची चर्चा शिवसेनेत सुरु आहे. शरद पवार राष्ट्रवादीमध्ये यासिन कुरेशी, सुधीर भगत, प्रकाश बर्डे, शानू पठाण, अभिजित पवार यांच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. अजित पवार गट आणि एमआयएमकडून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेची नावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम करणार असून त्यांनी शिफारस केलेल्या नावामधूनच एक जण तिजोरीची काळजी घेणार आहे.त्यामुळे अनुभव आणि उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या विश्वासातील सदस्य स्थायी समितीचा सभापती होईल, असे महापालिकेत बोलले जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.