जिल्हा

परफ्यूम विक्रेत्यांकडून तरुणाची फसवणूक

परफ्यूम विक्रेत्यांकडून तरुणाची फसवणूक
परफ्यूम विक्रेत्यांकडून तरुणाची फसवणूक फोटो: ठाणे वैभव
नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडून कारवाईची मागणी ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदा फेरीवाल्यांकडून ठाण मांडण्यात आले असून, विक्रेत्यांकडून नागरिकांची फसवणूक करून धमक्या दिल्या जात आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका, ठाणे नगर, नौपाडा आणि रेल्वे पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, आजही एका तरुणाची परफ्यूम विक्रेत्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे. या बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बनावट व मुदत संपलेल्या परफ्यूमची विक्री करीत काही समाजकंटक विक्रेत्यांकडून नागरिकांची लूट आणि आपला पाठलाग केल्याचा एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसाच प्रकार आज दुपारी घडला. सॅटीस पुलाजवळ परफ्यूम विक्रेत्यांच्या टोळीने गावदेवी मैदानालगतच्या एका दुकानातील कामगाराला १०० रुपयांना तीन परफ्यूम उपलब्ध असल्याचे सांगितले. या कामगाराने १०० रुपये दिल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे ५०० रुपये मागून चौघा जणांनी धमकावले. त्याच्याकडून एकूण १८०० रुपये `ऑनलाईन'द्वारे उकळले गेले. या प्रकाराची कामगाराने मालकाला माहिती दिली. त्यानंतर मालकाने स्टेशनवर येऊन परफ्यूम विक्रेत्यांकडून पुन्हा `ऑनलाईन'द्वारे पैसे वसूल केले. या घटनेबाबत दुकानमालकाने ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना माहिती दिल्यानंतर संजय वाघुले यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसह रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली. त्यानंतर परफ्यूम विक्रेते पळून गेले. त्यांच्याकडील बनावट व मुदतबाह्य परफ्यूमचा साठा कार्यकर्त्यांनी नष्ट केला.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600