जिल्हा

मुंब्रा-दिव्यातील १०९ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या

मुंब्रा-दिव्यातील १०९ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या
मुंब्रा-दिव्यातील १०९ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्ह‍िस सेंटर व अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्याची मोहिम आयुक्त सौरभ राव यांचे आदेशान्वये सुरु करण्यात आली आहे. 17 ते 22 एप्रिल 2024 दरम्यान दिवा, मुंब्रा परिसरातील एकूण 109 अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. दिवा साबेगाव, कोकणरत्न दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला 150 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे 18 व पाऊण इंची व्यासाच्या चार अशा एकूण 22, वेताळपाडा येथील 100 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाच्या एकूण 11, ग्लोबल स्कूलच्या पाठीमागे 200 मि. मी. जलवाहिनीवरील पाऊण इंची व्यासाच्या चार अशा एकूण नऊ, कोकण रत्न, दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला, साबेगाव 150 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाच्या एकूण पाच, मुंब्रा ठाकूरपाडा येथील नाल्याच्या बाजूला अर्धा इंची व्यासाच्या एकूण सहा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वारेकर स्कूलजवळ, मुंब्रा देवी कॉलनी येथे 100 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाच्या एकूण सहा, साबे गाव येथील नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच येथील 100 मी. पी.व्ही.सी पाईप व एक मोटर जप्त करण्यात आली आहे. साबेगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला 300 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाच्या एकूण 50 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 1150 मी.पी.व्ही.सी पाईप व दोन मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600