जिल्हा

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

१,२१,२४४ विद्यार्थी देणार परीक्षा ठाणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख २१,२४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, ३३८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला. त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनही नियोजन काटोकोर करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, ३३८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागात ६० आणि महापालिका क्षेत्रात २७८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर परीक्षा कामकाज २० परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे. दहावीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, प्रत्येक महापालिका व तालुका स्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके देखील कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. परीक्षा केंद्रांची संख्या: मनपा /तालुका परीक्षा केंद्रे ठाणे ७४ नवी मुंबई ४० कल्याण डोंबिवली ८६ कल्याण ग्रामीण ०२ उल्हासनगर २१ अंबरनाथ २१ मुरबाड ११ शहापूर ०९ भिवंडी ३५ भिवंडी ग्रामीण १७ मीरा भाईंदर २२ एकूण ३३८

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600