महाराष्ट्र

पीडब्ल्यूडी विभागाअंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी ११५६ कोटी खर्च

डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात दीड वर्षात ११५६ कोटी रुपयांचा विकास निधीतून कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिला आहे. सोमवारी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार शांताराम मोरे 290 कोटी, महेश चौघुले 42 कोटी, किसन कथोरे 287 कोटी, राजू पाटील 127 कोटी, विश्वनाथ भोईर 27 कोटी, दौलत दरोडा 227 कोटी, गणपत गायकवाड 62 कोटी, कुमार आयलानी 92 कोटी, सर्वपक्षीय आमदारांसाठी मिळून एकूण 1156 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या कोट्यवधी रुपयांच्या निधींच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरू आहेत. चव्हाण यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून दीड वर्षात राज्यात सर्वत्र विभागामार्फत विकास कामांसाठी प्रचंड निधी देण्यात आला आहे. डोंबिवली शहरातील टिळकनगर महाविद्यालय, जोंधळे महाविद्यालय, स.वा. जोशी महाविद्यालय येथे विधी कॉलेज सुरू करण्यात देखील तांत्रिक परवानग्या मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600