जिल्हा

अंबरनाथमध्ये १३ अतिधोकादायक इमारती

अंबरनाथ: अंबरनाथ शहरामध्ये २१० धोकादायक तर १३ अतिधोकादायक इमारती असल्याचे नगरपालिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींमधून स्पष्ट झाले आहे. शहरातील धोकादायक इमारतींना अपघात होऊन नागरिकांचे नाहक बळी जाऊ नये यासाठी नगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारती निष्कासित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अंबरनाथ पूर्व भागात १३० इमारती धोकादायक तर चार इमारती अति धोकादायक आहेत तर पश्चिम भागात ८० इमारती धोकादायक आणि नऊ इमारती अति धोकादायक असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मागीलवर्षी अंबरनाथ नगरपालिकेने आठ धोकादायक इमारती निष्कासित केल्या होत्या. यंदाच्या वर्षी देखील सहा इमारती निष्कासित करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600