जिल्हा

१४ लाख कल्याण-डोंबिवलीकर बजावणार मतदानाचा हक्क

कडोंमपा निवडणुकीत १६०४ मतदान केंद्रे कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत १६०४ मतदान केंद्रांवर १४ लाख २५ हजार ८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात पुरुष मतदार सात लाख ४५,६६४, महिला मतदार सहा लाख ७८,८७० तर इतर ५५२ मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून प्रभागनिहाय मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १६०४ मतदान केंद्रांवर आणि एकूण ३९२ लोकेशन्सवर मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी तळ मजल्यावर १०५५ मतदान केंद्र, पहिल्या मजल्यावर ९ मतदान केंद्र, पार्टिशन स्वरुपात ४८२ मतदान केंद्र आणि मंडपात ५८ मतदान केंद्र राहतील. यापैकी १६ ठिकाणी १० पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी- १ यांच्या निवडणूक प्रभागांत ५५, निवडणूक निर्णय अधिकारी- २ यांच्या निवडणूक प्रभागांत ४७, निवडणूक निर्णय अधिकारी- ३ यांच्या निवडणूक प्रभागांत ४०, निवडणूक निर्णय अधिकारी-४ यांच्या निवडणूक प्रभागांत २८, निवडणूक निर्णय अधिकारी-५ यांच्या निवडणूक प्रभागांत ४७, निवडणूक निर्णय अधिकारी-६ यांच्या निवडणूक प्रभागांत ४१, निवडणूक निर्णय अधिकारी-७ यांच्या निवडणूक प्रभागांत एकूण ४७, निवडणूक निर्णय अधिकारी-८ यांच्या निवडणूक प्रभागांत ४० व निवडणूक निर्णय अधिकारी नऊ यांच्या निवडणूक प्रभागांत एकूण ४७ लोकेशन्सवर मतदान प्रक्रिया होईल. वृद्ध मतदार, दिव्यांग मतदार, गर्भवती महिला इत्यादींना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी तळमजल्यावर जास्त प्रमाणात मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. मतदानाच्या वेळी रॅम्प, व्हीलचेअर इ. सुविधा आवश्यकतेनुसार मतदारांना पुरविल्या जाणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600