महाराष्ट्र
वाहनतळामधील १६ दुचाकी जळून खाक
बदलापूर: सोमवारी आलेल्या अवकाळी पावसाने झाडे पडून वाहनांचे नुकसान झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आज मंगळवारी सकाळच्या सुमाराला एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. यामुळे वाहनतळावर उभ्या असलेल्या १६ दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी मात्र टळली आहे.
रेल्वे स्थानकाजवळील वैशाली सिनेमागृहासमोरील कपड्यांच्या दुकानात आग लागली. आग वाऱ्यासारखी पसरल्याने सिनेमागृहासमोरील वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकींनी देखील पेट घेतल्याने हानी झाली आहे. बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600