जिल्हा

जिल्ह्यात कोरोनाचे १६६ नवीन रूग्ण

ठाणे: जिल्ह्यात सलग दोन दिवस नवीन कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक सुरूच आहे. आज १६६ रुग्णांची भर पडली असून एक जण दगावला आहे. सर्वात जास्त रूग्ण ठाणे महापालिका हद्दीत ७३ जण सापडले आहेत. नवी मुंबई येथे ५५ रुग्णांची भर पडली आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात सात, मीरा-भाईंदरमध्ये नऊ, बदलापूर भागात तीन, भिवंडीमध्ये दोन आणि ठाणे ग्रामीण भागात एका रुग्णाची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत सात लाख ५०,८२३जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९९८रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३८,६१२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर ११, ९८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600