जिल्हा

१७२ कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस

१७२ कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस
१७२ कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस फोटो: ठाणे वैभव
* ९५२ कोटी कोटींच्या वस्तूंचा बनावट व्यवहार करणाऱ्या कंपनी संचालकास अटक * ठाणे विभागाची कारवाई ठाणे: 952 कोटी रुपयांच्या वस्तूंचा बनावट व्यवहार दाखवून तब्बल 172 कोटी रुपयांचा आयटीसी परतावा (अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिट) घेतल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेझन पथकाने हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार एम/एस फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक भौमिक गांधी यांनी प्रत्यक्ष मालाची खरेदी-विक्री न करता आयटीसीचा परतावा घेत असल्याची बाब तपासामध्ये उघडकीस आली आहे. तपासादरम्यान संबंधित कंपनीच्या पुरवठादारांवर विभागीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले असता अनेक पुरवठादार अस्तित्वात नसल्याचे किंवा त्यांची नोंदणी रद्द झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एम/एस फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रा. लि. यांच्यासोबतचे व्यवहार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संचालक भौमिक गांधी यांच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या पुराव्यांमधून प्रत्यक्ष माल न घेता व न पुरवता आयटीसीचा गैरवापर केल्याचे उघड झाले. सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ७० अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात भौमिक गांधी यांनी या गैरप्रकारातील आपली भूमिका मान्य केली. बनावट व्यवहारांमधून कमिशन मिळवून स्वतः आर्थिक लाभ घेतल्याची कबुली त्यांनी दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १० फेब्रुवारी २०२६ रोजी भौमिक गांधी याला अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने जीएसटी चोरी व करचुकवेगिरीविरोधात कठोर भूमिका कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्ती व संस्थांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600