महाराष्ट्र

ठामपाचे २००० कर्मचारी करणार मराठा सर्वेक्षण

ठाणे : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ठाणे महापालिकेने दोन हजार कर्मचाऱ्यांना कामाला लावले असून हे सर्व कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. येत्या २३ जानेवारीपासून या सर्व्हेक्षणाला सुरुवात होणार असून ३१ जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी एक प्रश्नावली देखील तयार करण्यात आली असून या प्रश्नांच्या आधारे हे सर्व्हेक्षण केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सर्वेक्षणाला येत्या २३ जानेवारी सुरुवात करण्यात येणार आहे, तर हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महापालिका आणि तालुकास्तरावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका असे दोन स्तर तयार करून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना ऑनलाइन संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे. हे कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम करणार आहेत. यासाठी १०० प्रश्नांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज, ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. त्याशिवाय, धनगर समाजानेही आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सर्व्हेक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. या सर्वेक्षणासाठीचे निकष एकसमान असतील, असा धोरणात्मक निर्णय आयोगाने घेतला आहे. राज्यात एक लाखहून अधिक शासकीय कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. तर ठाण्यात यासाठी दोन हजार कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600