महाराष्ट्र

प्लास्टिक प्रतिबंध कारवाईत २० हजारांचा दंड वसूल

नवी मुंबई: शानानने बंदी घातलेल्या प्लास्टिक विक्री विरोधात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व नवी मुंबई महानगर पालिकेने दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, व क्षेत्र अधिकारी अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उप आयुक्त डॉ.राहुल गेठे (घ.क.व्य) उप आयुक्त सोमनाथ पोटरे (परि-१) सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी, जयेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तुर्भे विभाग कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणार्‍या व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव करणार्‍या व्यावसायिकांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.या कारवाई करून एकूण २० हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600