देश-विदेश

काश्मीरमध्ये दहशवादी हल्ल्यात २७ पर्यटक ठार

काश्मीरमध्ये दहशवादी हल्ल्यात २७ पर्यटक ठार
काश्मीरमध्ये दहशवादी हल्ल्यात २७ पर्यटक ठार फोटो: ठाणे वैभव
* सात ते आठ दहशतवादी पोलिसांच्या वेशात * केंद्र सरकार ऍक्शन मोडवर नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुमारे सात ते आठ दहशवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. दहशतवाद्यांना 40 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्यात फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, आपण श्रीनगरला रवाना होत असल्याचेही अमित शाह यांनी ट्विटरवरुन सांगितले. दरम्यान, अमित शाह दिल्लीतून श्रीनगरला रवाना झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून काश्मीरमधील पर्यटकांसाठी 24 तास मदत सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनंतनाग येथील पोलीस कंट्रोल रुममधून ही सेवा पुरविण्यात आली असून व्हॉट्सअप आणि टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600