जिल्हा
निवडणुकीच्या कामाकरिता टीएमटीच्या २७५ बसेस तैनात
ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची मतदान प्रक्रिया बुधवार 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत.
14 ते 15 जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे 75 टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे शहरात दोन दिवस बससेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी नमूद केले.
निवडणूक प्रक्रियेसाठी 14 आणि 15 जानेवारी रोजी 275 बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे 14 जानेवारी रोजी सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 15 जानेवारी रोजी सायंकाळी 4 नंतर फक्त 80 ते 85 बसेस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गांवर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करुन परिवहन सेवेस सहकार्य करावे, असे आवाहन परिवहनच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600