महाराष्ट्र

आषाढी एकादशीसाठी ठाण्यातून ४६ एसटी बसेस

ठाणे : यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणा-या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून 13 जुलै 2024 पासून गाड्या सोडण्यात येणार आहेत. 17 ते 22 जुलै 24 पासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. सोडण्यात येणा-या सर्व गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून एस.टी परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरीता जाणा-या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेसने प्रवास करून संबंधित सवल सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आले आहे. भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी केले आहे. आरक्षणास उपलब्ध केलेल्या फे-या ठाणे आगार एक मार्गावर बोरिवली, सायन-पंढरपूर व ठाणे-फलटण- पंढरपूर 16 जुलै 24 रोजी सकाळी 8 आणि रात्री 8 वाजता, 17 जुलै रोजी08 वाजता तर 18 जुलै रोजी 8 वाजता व ठाणे एक एकूण गाड्या आठ आहेत. आगार दोनच्या बसगाड्या एकूण सहा असतील. भिवंडी आगाराच्या एकूण पाच बसगाड्या सुटणार आहेत. तद्नुसार, कल्याणहून सहा गाड्या, मुरबाडहून पाच बस गाड्या, विठ्ठलवाडीहून एकूण सहा बसगाड्या आणि वाडा येथून पाच बस गाड्या पंढरपूर येथे जाणार आहेत. पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने यावर्षी विभागातून एकूण 46 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन ठाणे विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600