जिल्हा
भिवंडीतील रुद्र मोरे एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेत महाराष्ट्रातून चौथा
भिवंडीतील रुद्र मोरे एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेत महाराष्ट्रातून चौथा
फोटो: ठाणे वैभव
पडघा: भिवंडी तालुक्यातील आर.के.पालवी इंग्रजी शाळेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा रुद्र मोरे या विद्यार्थ्याने एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून चौथा क्रमांक मिळवला.
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी कला शिक्षिका नम्रता शेलार, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पालवी यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्याच्या यशामुळे पडघा गावाचे नाव राज्यात उंचावले आहे. आर.के.पालवी इंग्रजी शाळेतील शिक्षक आणि विविध स्तरातून रुद्र मोरेवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600