महाराष्ट्र
५४,८३४ विद्यार्थी देणार बीकॉम सत्र ६ ची परीक्षा
ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राची बीकॉम सत्र ६ ची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेला ५४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत.
या परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील २४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत. एकूण परीक्षार्थींसह व अन्य पुनर्परिक्षार्थी ६५१९ आणि दिव्यांग विद्यार्थी १९६ आहेत.
विद्यापीठाने सर्व लीड महाविद्यालयांची एक बैठक घेऊन उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. परीक्षा घेणे व त्याचबरोबर मूल्यांकन करणे हे महाविद्यालयाला आवश्यक आहे. प्रत्येक महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जेणेकरून निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. या सर्व लीड महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे यांनी माहिती दिली.
सर्व महाविद्यालयाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी परीक्षेची प्रवेशपत्रे, विविध महाविद्यालयातील परीक्षा केंद्रे याचा आढावा परीक्षा व निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी घेतला होता. महाविद्यालयाला परीक्षेचे साहित्य व उत्तरपत्रिका तसेच ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा आढावा कॅपचे उपकुलसचिव संतोष सोनावणे यांनी घेतला होता. परीक्षेची प्रश्नपत्रिका डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेपर डिलिव्हरी पद्धतीमार्फत २४९ परीक्षा केंद्रांना पाठविण्यात येणार आहेत. याचा आढावा उपकुलसचिव सुनील खतेले यांनी घेतला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600