जिल्हा

कडोंमपाकडून ६२ अनधिकृत नळजोडण्या खंडीत

कडोंमपाकडून ६२ अनधिकृत नळजोडण्या खंडीत
कडोंमपाकडून ६२ अनधिकृत नळजोडण्या खंडीत फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण (पूर्व) विभागाला जाणा-या पाणी पुरवठा मुख्य जलवाहिनीवरील दुर्गाडी किल्ला ते सर्वोदय सोसायटी दरम्यान तबेला धारकांनी घेतलेल्या अनधिकृत नळ जोडण्या पोलीस बंदोबस्तात खंडीत करण्याची धडक कारवाई गुरुवारी करण्यात आली. या कारवाईत अर्धा इंच व्यासाच्या तीन नळजोडण्या, एक इंच व्यासाच्या 26 नळजोडण्या, दीड इंच व्यासाच्या 31नळजोडण्या आणि दोन इंच व्यासाच्या दोन नळजोडण्या अशा एकुण 62 अनधिकृत जोडण्या खंडीत करण्यात आल्या. ही कारवाई पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, शैलेश मळेकर तसेच अ, ब, क, ड, जे व ह प्रभागातील उप अभियंता महेश डावरे, राजेश गोयल, किशोर भदाणे, उदय सुर्यव‍ंशी, व कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकंडे, सुनिल वाळंज, मयुर शिंदे, दयाराम पाटील आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी पार पाडली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600