जिल्हा

७५ लाखांच्या थकबाकीपोटी रुग्णालयाचे कार्यालय सील

७५ लाखांच्या थकबाकीपोटी रुग्णालयाचे कार्यालय सील
७५ लाखांच्या थकबाकीपोटी रुग्णालयाचे कार्यालय सील फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधिक तीव्र करण्यात येत आहे. बुधवारी कल्याण (प). मुरबाड रोड येथील 4 जे प्रभागातील ए ॲण्ड जी रुग्णालयाच्या 75 लाख 47 हजार 25 रुपये एवढ्या थकबाकीपोटी या रुग्णालयाचे व्यवस्थापन कार्यालय सील करण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या 4 जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथकाने केली. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी कराचा भरणा विहित मुदतीत करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600