महाराष्ट्र

बोगस सीबीआय अधिकाऱ्याकडून ८० लाखांची फसवणूक

नवी मुंबई : स्वतःला सीबीआयचा कर्मचारी सांगून एका व्यक्तीने वनविभागाची पडीक ५०० एकर जमीन नावावर करून देतो असे सांगून कोल्हापूरच्या ठेकेदारासह त्याच्या मित्राची ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्हातील आरोपी सुनील धुमाळ यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा कळंबोली येथे कार्गो ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून त्यातून कोरेगावच्या सुनील धुमाळ याच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या धुमाळ याने तो सीबीआयमध्ये कॉन्स्टेबल चालक असल्याचे सांगितले होते. तसेच लाल दिव्याची गाडी घेऊनच तो अनेकदा त्यांच्या भेटीला येत असे. यादरम्यान त्याने ७० ते ८० लाखात वनविभागाची जमीन नावावर करून मिळेल असे घोरपडेंना सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून घोरपडे यांनी त्यांचा मित्र प्रसाद जैन याच्या मदतीने दोघे मिळून आजरा येथील ५०० एकर वनजमीन नावावर करून घेण्याची तयारी दाखवली होती. या संदर्भात त्याला रोख व ऑनलाईन असे टप्प्या टप्प्याने ८० लाख रुपये देण्यात आले. यानंतर धुमाळ याने त्यांना भारत सरकारची जमीन हस्तांतरणाचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाचे आदेशाचे पत्रही दिले होते. परंतु जमीन हस्तांतरणाची अंतिम आदेश देण्यात उशीर होऊ लागल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. त्यामध्ये कोर्ट आदेश, भारत सरकाचे पत्र बनावट असल्याचे समोर आले.त्यानंतरही तो घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशी केली असता त्याचे वापरलेले ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. यावरून तो सीबीआय कर्मचारी नसतानाही लाल दिव्याची गाडी वापरून तो शासकीय कर्मचारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत होते. शेवटी मंगळवार २८ मे रोजी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600