महाराष्ट्र
चांदीचे ८५ हजार तर सोने २५ हजार रुपयांनी स्वस्त
मुंबई : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला मोठा ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 तासात चांदीच्या दरात 85 हजार रुपयांची घसरण तर सोन्याच्या दरात 25 हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलं. एमसीएक्सवर काल चांदीच्या वायद्याचे दर चार लाख २० हजारांच्या उच्चांकावर तर, सोन्याचे दर दोन लाखांच्या जवळ पोहोचले होते.
शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता 1 किलो चांदीच्या वायद्याचे दर तीन लाख 35 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीने चार लाख २० हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. म्हणजेच 24 तासात चांदीचे दर ८५ हजार रुपयांनी कमी झाले. सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या वायद्याचे दर एक लाख ९३ हजार रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यात 24 तासात 25,500 रुपयांची घसरण झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली नफा वसुली हे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी सुरु होती. दररोज नवे विक्रम निर्माण होत होते. चांदीचे दर तीन लाखांहून चार लाखांपर्यंत विक्रमी वेगानं वाढले होते. सोन्याच्या दरात देखील तेजी आली होती, यावेळीच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचा मार्ग निवडल्यानं सोने आणि चांदीचे दर घसरले.
काही तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीमध्ये विक्री वाढली तशी काही शॉर्ट सेलर्सलनं एंट्री केली आणि ट्रेडिंग दरम्यान चांदीला शॉर्ट केलं. यामुळं चांदीच्या दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आणि धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.