जिल्हा
मुंबईत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार
मुंबई : महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद भाजपकडे, स्थायी समितीचे अध्यक्षपदही भाजपकडे असणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील सत्ता समीकरणांसदर्भात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती, त्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचे प्रभाकर पै १९८२मध्ये महापौर बनले होते. आता पुन्हा एकदा मंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार आहे. तब्बल 25 वर्षानंतर ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्ता जाऊन महापौरपद भाजपकडे येणार आहे. यापूर्वी अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप-89, शिवसेना ठाकरे गट-65, शिवसेना-29, काँग्रेस-24, मनसे-6, एमआयएम-8, एनसीपी-3, एसपी-2, एनसीपी शप-1, एकूण-227
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.