जिल्हा

९९ वर्षांच्या माजी शिक्षिका लीला श्रोत्री यांचे उत्साहात मतदान

९९ वर्षांच्या माजी शिक्षिका लीला श्रोत्री यांचे उत्साहात मतदान
९९ वर्षांच्या माजी शिक्षिका लीला श्रोत्री यांचे उत्साहात मतदान फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्याच्या टेंभी नाका येथील परमार हाऊसमध्ये राहणाऱ्या शिव समर्थ विद्यालयाच्या माजी शिक्षिका श्रीमती लीला क्षोत्री वय वर्ष 99 यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. सिने अभिनेता पुष्कर क्षोत्री यांच्या त्या पणजी आहेत. शाळेचा माजी विद्यार्थी दिलीप फाटक यांनी त्यांना आपल्या रिक्षातून जवळच असलेल्या बी.जे हायस्कूल येथील मतदान केंद्रावर नेले. मतदान केंद्रावर बाईंना मतदान करायला उंच पडत असल्यामुळे केंद्रातील मदतनीस यांनी एकावर एक अशा तीन खुर्च्या लावून बाईंना त्यावर बसवले आणि मग त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. वय वर्ष 99 असूनही त्यांच्यातला उत्साह पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेली अनेक वर्ष त्यांनी नियमित मतदान केलेले आहे आज या वयातही मुलांचे वर्ग घेत असून शाळेतील माजी शेकडो विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या दिवशी न चुकता सकाळी पहिला फोन करतात इतकी त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याने विद्यार्थी आवक झाले आहेत. सर्वांनी मतदान करून लोकशाहीचा हक्क बजवावा, असे मतदान झाल्यावर बोलताना त्यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेने त्यांचा ठाणे गौरव पुरस्काराने सन्मान केलेला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600