जिल्हा

ठामपा मुख्यालयाच्या भिंतीवर लावलेला बॅनर वाहनांवर कोसळला

ठामपा मुख्यालयाच्या भिंतीवर लावलेला बॅनर वाहनांवर कोसळला
ठामपा मुख्यालयाच्या भिंतीवर लावलेला बॅनर वाहनांवर कोसळला फोटो: ठाणे वैभव
सुदैवाने दुर्घटना टळली ठाणे : ठाणे महापालिकेने होर्डिंग आणि बॅनरविरोधात मागिल आठवड्यात मोहीम उघडली खरी, पण महापालिका मुख्यालयाच्या भिंतीवर लावलेला बॅनर पार्क केलेल्या गाडीवर पडल्याने मोहिमेचा फज्जा उडाल्याची टीका होऊ लागली आहे. पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयाच्या भिंतीवर एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाचा बॅनर लावण्यात आला होता. आज दुपारी हा बॅनर अचानक एका पार्क केलेल्या चार चाकी गाडीवर पडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर पडलेला बॅनर हटविण्यात आला. १५ दिवसांपूर्वी घोडबंदर महामार्गांवर दुचाकी स्वाराच्या अंगावर बॅनर पडला होता. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु महापालिकेच्या भिंतीवरच अनधिकृत बॅनर लावण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600