महाराष्ट्र

कळव्यात कारवाईचा बुलडोझर; बहुमजली इमारतीही रडारवर

ठाणे: गेल्या तीन दिवसांत कळवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत इमारती आणि बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी पदभार घेताच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भूमाफिया आणि तथाकथित बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. हिवाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात सुरू असलेली शेकडो बेकायदा बांधकामे आणि अधिकाऱ्यांचे बिल्डरांशी असलेले साटेलोटे याबाबत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह सर्व महापालिकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सहायक आयुक्तांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार कळवा प्रभाग समितीचे नवनियुक्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा दणका दिला आहे. दिवा आणि मुंब्र्यापाठोपाठ कळवा प्रभागात जास्त अनधिकृत बांधकामे असून त्यावर कारवाई हीत नसल्याने सुबोध ठाणेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन दिवसात नवे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी चार प्लिंथ आणि दोन मोठ्या इमारतींवर बुलडोझर फिरवत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई यापुढेही अशीच कठोरपणे करण्यात येणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. या जोरदार कारवाईमुळे कळवा, खारीगाव, विटावा आदी भागातील भूमाफिया आणि तथाकथित बिल्डर मंडळींचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विटाव्यात कारवाईचे आव्हान सुबोध ठाणेकर यांच्या काळात विटाव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. त्यावेळी बहुमजली इमारतींचे पेव फुटले होते. या इमारतींवरही कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका सामाजिक संस्थेने येथील अनधिकृत बांधकामांची यादीच श्री.बोरसे यांना सादर केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600