जिल्हा

टोइंग व्हॅन रोखणाऱ्या नागरिकावर गुन्हा दाखल

ठाणे: रस्त्यावरील गाड्या उचलताना नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाविरोधात आवाज उठविणाऱ्या जागरूक नागरिकांच्या विरोधातच गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांनी तालिबानी वृत्ती दाखवली. त्यामुळे पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. १९ऑगस्ट रोजी उपवन तलाव परिसरातील नो पार्किंग परिसरात दुचाकी गाड्या उचलणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना चेतन चिटणीस आणि रितू टेलर यांनी गाड्या उचलणाऱ्या वाहन चालकाकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली होती, परंतु ते परवाना दाखविण्यात असमर्थ ठरले. तेव्हा त्या जागरूक तरुणाने कारवाई केलेल्या गाड्या पुन्हा खाली ठेवण्यासाठी टॉइंग व्हॅन थांबवून ठेवली. नागरिकांच्या विरोधामुळे अखेर सर्व गाड्या पुन्हा खाली ठेवण्यात आल्या. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याला ठाणेकरांनी दाद दिली होती. मात्र आज वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600