जिल्हा

नवी मुंबईतील विकासकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

नवी मुंबईतील विकासकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
नवी मुंबईतील विकासकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरु चिचकरने आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. चिचकरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्याच्या मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील आहेत. नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे. नवीन चिचकर हा एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवीन चिचकर विरुद्ध लूक आऊट नोटीस देखील जारी केली आहे. आत्महत्या करण्यासाठी नऊ मि. मी. गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600