महाराष्ट्र
येऊर येथे फार्म हाऊसवर दरोडा
ठाणे : येऊर येथे बिल्डर सुधीर मेहता यांचा मालकीच्या फार्महाऊसवर गुरुवारी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून 19 लाखाचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवसायाने बिल्डर असलेल्या सुधीर मेहता (50) यांचा ठाण्यातील येऊर हिल्स येथे पुष्पा फार्महाऊस आहे. गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सात जणांच्या दरोडेखोर टोळीने त्यांच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश केला. यावेळी फार्महाऊसमध्ये सुधीर मेहता व त्यांचा मित्र विनय नायर असे दोघेजण झोपले होते. दरोडेखोरांनी त्यांच्याकडील गन, सुरा इत्यादी हत्यारांचा धाक दाखवून, तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत एकूण 19 लाख 90 हजार रुपये किमतीचे दागिने लुटून नेले. दरोडेखोरांनी मंकी कॅप व हातात ग्लोव्हज घातले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वर्तकनगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक या दरोड्याचा समांतर तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600