जिल्हा
अंबरनाथला आनंदनगर एमआयडीसीत कंपनीला भीषण आग
अंबरनाथ: अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीमधील एका फोमच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळच्या सुमाराला घडली, सुदैवाने हानी टळली आहे.
आनंदनगर एमआयडीसीतील दशमेश फोमच्या कंपनीला आज बुधवार (12 ) जुलै रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास भीषण आग लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. तत्काळ एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग वाऱ्याच्या गतीने पसरल्याने आगीत कंपनी ६० टक्के जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आनंदनगर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ ९१ येथे दशमेश फोम इंडस्ट्रीज ही कंपनी २०२१ पासून कार्यरत आहे. २० ते २५ कामगार या कंपनीत काम करतात. बुधवारी सायंकाळी अचानक आग लागल्याचे कळताच कंपनीतील सर्व कामगार बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग पसरत असल्याने एमआयडीसी अग्निशमन दलाच्या बंबासोबत अंबरनाथ नगरपरिषद आणि बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान ६० टक्के कंपनी आगीत भस्मसात झाल्याची माहिती अंबरनाथ अग्निशमन दलप्रमुख डॉ. भागवत सोनोने यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600