या विचित्र अपघातात तीन बस प्रवासी मयत झाले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. १४ जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा जण शहापूर येथे उपचार घेत आहेत.
दरम्यान अपघताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु करीत जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गांवरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
जिल्हा
शहापूरजवळ पाच वाहनांचा भीषण अपघात
शहापूरजवळ पाच वाहनांचा भीषण अपघात
फोटो: ठाणे वैभव
तिघांचा मृत्यू तर १४ जण जखमी
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघरनजिक झालेल्या विचित्र अपघातात तीन प्रवासी ठार झाले तर १४ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे 3.50 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला व कंटेनरने समोर असलेल्या तीन वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बसला धडक दिली.
या विचित्र अपघातात तीन बस प्रवासी मयत झाले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. १४ जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा जण शहापूर येथे उपचार घेत आहेत.
दरम्यान अपघताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु करीत जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गांवरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
या विचित्र अपघातात तीन बस प्रवासी मयत झाले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. १४ जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा जण शहापूर येथे उपचार घेत आहेत.
दरम्यान अपघताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु करीत जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गांवरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600