देश-विदेश

जैसलमेरमध्ये बसला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू

जैसलमेरमध्ये बसला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू
जैसलमेरमध्ये बसला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू फोटो: ठाणे वैभव
जैसलमेर: राजस्थानातील जैसलमेर येथे आज (१४ ऑक्टोबर) प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती. त्याचवेळी बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या बसमधले १४ प्रवासी गंभीर भाजले आहेत बसच्या समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आलं आहे. पण मागच्या सीटवर बसलेले लोक भाजले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील १४ प्रवासी गंभीररित्या भाजले गेले आहेत आणि त्यापैकी १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त ऑल इंडिया रेडिओने दिलं आहे. बस जैसलमेरवरुन जोधपूरला येथे जात होती. जेव्हा ही बस वॉर म्युझियमच्याजवळ पोहचली, असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणात बस जळून खाक झाली. त्यामुळे कोणाला वाचवण्याची संधी मिळाली नाही. आग लागली तेव्हा बसमध्ये ५० प्रवासी बसले होते. आग लागल्यानंतर काही प्रवासी खिडक्या आणि दरवाज्यातून बाहेर आले. परंतु काही प्रवासी अडकले आणि आगीच्या तावडीत सापडले. रस्त्यावरील लोकांनी या अपघाताची तक्रार पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु झाले.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600