जिल्हा
कल्याण पूर्वेत गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला
कल्याण : पत्री पूलनजीक असलेल्या उर्दू शाळेसमोरच गॅस सिलेंडरने भरलेले वाहन अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आज पहाटे पाचच्या सुमारास कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉलसमोर असणाऱ्या महापालिकेच्या उर्दू शाळेसमोर हा अपघात घडला. सूचक नाक्याकडून हा घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक कल्याणकडे येत होता.
मेट्रो मॉलसमोरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक दुभाजकाला धडकून उलटला. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये असणारे सर्व गॅस सिलेंडर हे भरलेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ट्रक उलटल्यानंतर काही गॅस सिलेंडर रस्त्यावर पसरल्याने या ठिकाणी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान कोळसेवाडी ट्राफिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या ट्रकमध्ये असणारे भरलेले गॅस सिलेंडर रस्त्याच्या एका बाजूला गोळा करून ठेवले आणि क्रेन मागवून तातडीने हा ट्रक रस्त्यावरून बाजूला केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600