जिल्हा

लिफ्टमध्ये १५ तास अडकलेल्या कामगाराची सुखरूप सुटका

लिफ्टमध्ये १५ तास अडकलेल्या कामगाराची सुखरूप सुटका
लिफ्टमध्ये १५ तास अडकलेल्या कामगाराची सुखरूप सुटका फोटो: ठाणे वैभव
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याची तत्परता ठाणे: वीजपुरवठा खंडित झाल्याने तब्बल १५ तास लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या एका मजुराची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे दोन तासांत सुटका झाली. माजिवडा पेट्रोल पंपसमोर, अशर प्लस या निर्माणाधीन इमारतीमध्ये रंग कामाकरिता उभारलेली ओपन लिफ्ट विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बंद पडली. त्यामुळे कलकत्ता येथील आलो हुसेन (३९) हा कामगार इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर मंगळवारी दुपारी तीन वाजता अडकला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता ११ तासांपासून कामगार लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती बाळकूम अग्निशमन केंद्राला देण्यात आली. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मात्र विद्युत पुरवठाच खंडित असल्याने बचावकार्याला मुख्य अडथळा येत होता. ४ वाजता जेव्हा स्वतः आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी दाखल झाले तेव्हा विद्युत पुरवठा आल्याशिवाय बचावकार्य अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ महावितरणशी संपर्क साधला. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांचा संप असल्याचे त्यांना उत्तर मिळाल्यांनतर थेट महावितरणचे अधिकारी राठोड यांना संपर्क करून कामगाराचा जीव वाचवायचा आहे असे सांगितले. राठोड यांनी महावितरणचे कर्मचारी पाठवले. तसेच जनरेटरची सोय करण्यात आली. त्यामुळे दोन तासांत हुसेन याची सुटका झाली. सुखरूप सुटका झाल्यानंतर आपला पुनर्जन्मच झाला असल्याची प्रतिक्रिया हुसेन यांनी दिली. ज्या मजल्यावर हुसेन अडकले होते त्याच्या काही अंतर वरून त्यांचे मित्र त्यांची काळजी घेत होते. त्यांना पाणी आणि इतर साहित्य पुरवत होते .तसेच त्यांना मानसिक धीर देखील देत होते. नौपाड्यातही लिफ्टमधून वृद्धाची सुटका ठाण्याच्या नौपाडा परिसरात इमारतीच्या लिप्टमध्ये अडकलेल्या ५० वर्षीय शांतीलाल बोवा या इसमाची २० मिनिटात अग्निशमन दलाने सुटका केली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. राम मारुती क्रॉस रोड परिसरातील तळ अधिक सात मजली कृष्णा विहार सोसायटी या इमारतीच्या पहिल्या व तळमजल्याच्या मधोमध लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शांतीलाल बोवा हे अडकले. बोवा हे तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जात असताना हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600